साहित्य: २ जाड रताळी, ३ वाटय़ा नारळाचे दूध, किसलेला गूळ अर्धी वाटी, तूप, लवंगा.
कृती: रताळी किसून घ्यावी. तुपात लवंगा घालून त्यात किस घालावा आणि परतून मंद आगीवर शिजवत ठेवावा. दुधात गूळ विरघळवून गाळून घ्यावा. शिजलेल्या किसात हळूहळू ओतून पाचेक मिनिटे शिजवावे. आवडीप्रमाणे सुका मेवा, वेलचीपूड घालावी.