नवी दिल्ली, ९ जून २०२१: कोरोना कालावधीत प्रतिकारशक्तीसाठी चांगला फिटनेस खूप महत्वाचा आहे. यामुळेच लोकांमध्ये फिटनेसची मागणी वाढत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटाही फिटनेसच्या व्यवसायात उतरत आहेत.
बिगबास्केटला आपले बनवल्यानंतर टाटा ग्रुपची कंपनी टाटा डिजिटल फिटनेस आणि वेलबीइंग स्टार्टअप क्योरफिट हेल्थकेयर विकत घेत आहे आहे. टाटा डिजीटलने म्हटले आहे की ते क्युरफिटमध्ये ७.५ कोटी अमेरिकन डॉलर्स (सुमारे ५५० कोटी रुपये) गुंतवणूक करेल. मात्र या गुंतवणूकीतून कंपनी किती भागभांडवल घेईल याचा खुलासा कंपनीने केलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे मेच्या अखेरीस टाटा डिजिटलने बिग बास्केटचे अधिग्रहण पूर्ण केले. बिगबास्केटमध्ये कंपनीने ६४ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. टाटा डिजिटलला अधिग्रहण आणि गुंतवणूक करता यावी यासाठी टाटा सन्सने टाटा डिजिटलला २००० कोटी रुपये वाटप केले आहेत.
मिंत्रा लाँच करणारे बन्सल यांनी सुरू केले क्युरफिट
२०१६ मध्ये मुकेश बन्सल यांनी अंकित नागोरी यांच्यासमवेत cure.fit सुरू केले. सध्या बन्सल हे cure.fit चे सीईओ आहेत. ते त्याचे सह-संस्थापक देखील आहे. त्यांनी आशुतोष लव्हानिया आणि विनीत सक्सेना यांच्यासमवेत २००७ मध्ये फॅशन ई-कॉमर्स कंपनी मिंत्रा लाँच केली. यानंतर, २०१४ मध्ये मिंत्राला फ्लिपकार्टने ३३ कोटी डॉलर मध्ये खरेदी केले. वाणिज्य व जाहिरातीचे व्यासपीठ सांभाळणारे बन्सल २०१६ पर्यंत मिंत्राचे बोर्ड चेअरमन राहिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे