रतन टाटा यांना भारतीय उद्योग जगामध्ये रोल मॉडेल म्हणून बघितले जाते. रतन टाटा यांची उद्योगधंद्यांमध्ये जागतिक स्तरावर एक वेगळीच ओळख आहे.त्यांच्या बाबतीत असे म्हटले जाते की ते जिथे हात लावेल त्याचे सोने बनवतात म्हणजेच ते ज्या उद्योग क्षेत्रांमध्ये उतरले आहेत त्या प्रत्येक उद्योग क्षेत्रात यशाची शिखरे त्यांनी गाठली आहेत.
सध्या रतन टाटा स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करत आहेत. आता रतन टाटा ओला इलेक्ट्रिक मध्ये गुंतवणूक करत आहेत. सध्या वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि ग्लोबल वॉर्मिग यामुळे वाहन क्षेत्रातील बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या कडे लक्ष केंद्रित करत आहे. भारत सरकार नेही असा निर्धार केला आहे की २०३० पर्यंत देशतील सर्व वाहने हे इलेक्ट्रॉनिक असतील. लोकांनी या वाहनांची खरेदी करावी म्हणून सरकार या वाहनांच्या खरेदीवर कर सवलत ही देत आहे. ओळही भारतातील भाडेतत्त्वावर वाहन देणाऱ्या कंपण्यांपैकी एक मोठी कंपनी आहे. ही कंपनी आता इलेक्ट्रॉनिक वाहिकल मध्ये येत आहे. ओला आता आपली इलेक्ट्रॉनिक टॅक्सी आणण्याची योजना करत आहे. ओला एलेक्ट्रिक मोबिलिटी ने रतन टाटा यांच्या गुंतवणुकी पूर्वी पहिल्या राउंड मध्ये ४०० करोड रक्कम जमा केली आहे. ओला मध्ये टायगर ग्लोबल मॅट्रिक्स इंडिया ने ही गुंतवणूक केली आहे. ओला चे बिझनेस मोडेल रतन टाटा यांना ही आवडले आहे त्यामुळे त्यांनी ओला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. रतन टाटा ओला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किती गुंतवणूक करणार आहे हे अजून समजले नाही. २०१८ मध्ये ओलाने इलेक्ट्रिक कॅब ची संकल्पना मांडली होती. ओला चे २०२१ पर्यंत १० लाख इलेक्ट्रॉनिक विहिकल बनवण्याचा उद्देश आहे.
सध्या ओला बॅटरी स्वापिंग, चार्जिंग सोल्युशनस आणि दोन चाकी तीन चाकी वाहने तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. देशामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांचा इकोसिस्टम वेगाने वाढत आहे, चार्जिंग स्टेशन चे काम वेगाने सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन्स बनवले जात आहेत जेणेकरून इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या साह्याने येणे जाणे सोपे पडेल. जर भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक विमानांचे काम काम वेगाने पूर्ण झाले तर भारत चीन पेक्षा या बाबतीत पुढे जाऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या विक्रीमध्ये या वाहनांची असलेली किंमत अडथळा आणू शकते यासाठी भारत सरकारने या वाहनांमध्ये सवलत दिली पाहिजे जेणेकरून लोक ह्या वाहनांकडे आकर्षित होतील. साल २०१८ मध्ये इलेक्ट्रॉनिक महारांची विक्री ५६ हजार नग एवढी होती तर हाच आकडा दोन हजार सतरा मध्ये २५००० एवढा होता. ही आकडेवारी येणाऱ्या वर्षांमध्ये वाढवण्याची आवश्यकता आहे. वाढते प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिग मुळे या गोष्टीकडे जगातील सगळ्या उद्योजकांचे लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे ओला इलेक्ट्रॉनिक मध्ये एवढी गुंतवणूक होत आहे. ही संधी बघून रतन टाटांनी या कंपनी मध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. असे म्हंटले जात आहे की रतन टाटा यांचा पैसा आणि अनुभव ओला इलेक्ट्रॉनिक का नव्या उंचीवर घेऊन जाईल.