रतन टाटा यांचा सवाल: कर्मचार्‍यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का?

मुंबई ,२५ जुलै २०२० : कोरोना असल्यामुळे सर्वत्र लॉक डाउन आहे. उद्योगधंदे आणि छोटे मोठे व्यवसाय बंद आहेत. अशातच सर्वांनाच रोजगाराचा प्रश्न पडलेला आहे. या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच पगार कपात करत आहेत.तसेच काही कर्मचाऱ्यांना लोकल वाहतूक बंद असल्यामुळे जाता येत नाही आहे. यावर टाटा ट्रस्टचे चेअरमन तथा उद्योगपती रतन टाटा यांनी नाराजी व्यक्त करत, कर्मचार्‍यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का? हा सवाल उपस्थित केला आहे.

ही तिच लोकं आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलंय, तुमच्यासाठी कारकीर्द देणाऱ्या या लोकांना तुम्ही आज उघड्यावर सोडून देत आहात, ही तुमच्या नितिमत्तेची व्याख्या आहे का? असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे.

त्यांनी युवर स्टोरीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे.कर्मचारी हे कंपनी साठी दिवसरात्र झटत असतात आणि उत्तम कामगिरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संवेदनशीलता सर्वोपरी असते. साथीच्या काळात तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांशी असे वागता, ही तुमची नैतिकता आहे का?

व्यवसायात नुकसान झाले म्हणून तुम्ही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणं योग्य नाही. उलट त्या लोकांबद्दल आपली जबाबदारी असते. असं ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा