रेशन दुकानदारांना पिक विमा कवच मिळावे, रेशन दुकानदारांची मागणी.!

लोणी काळभोर, दि. ०१ सप्टेंबर २०२०:कोरोनाच्या संकट काळात रेशन दुकानदार नियमितपणे लाभार्थ्यांना धान्य वाटप करीत आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोना योद्धा, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सफाई, कर्मचारी पोलिस प्रशासन यांना शासनाने विम्याचे संरक्षण दिले आहे.

याच धर्तीवर रेशन दुकानदारांना ही विमा कवच मिळावी अशी मागणी हवेली तालुक्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य विक्रेता व केरोसीन विक्रेता दुकानदार यांनी व संघाच्या अध्यक्षा हेमलता बडेकर, उपाध्यक्ष सागर शहा, व सदस्यांनी हवेली तालुक्याचे तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. रेशन दुकानदाराचा आरोग्याचा विचार करून याच शासनाने विमा संरक्षण देण्याची गरज आहे.

पूर्वी शहरातील दोन रेशन दुकानदारांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये संसर्गाची लागण होऊन रेशन दुकानदार दगावला तर त्याचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल, हे शासनाने लक्षत घ्यावे व रेशन दुकानदारांना विमा कवच देऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सहकार्य करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

अद्याप तरी हवेली तालुक्यातील रेशन दुकानदाराला विमा कवच देण्याबाबत काही निर्णय झालेला नसून, रेशन दुकानदाराला केंव्हा विमा कवच मिळेल असे हवेली येथील रेशन दुकानदार विचारणा करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा