रत्नागिरी पोलिसांनी ८० मोबाईल फोन मूळ मालकांना केले परत

9

रत्नागिरी, २५ नोव्हेंबर २०२२ : मागील दोन महिन्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाणे आणि तांत्रिक विश्लेषण शाखेने रत्नागिरी जिल्ह्यातून हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाइल्स (भ्रमणध्वनी) शोधून काढले. या शोधप्रक्रियेत रत्नागिरी पोलिसांनी एकूण ८० मोबाईल हॅंडसेट जप्त केले. जप्त करण्यात आलेले एकूण ८० मोबाईल हॅंडसेट (भ्रमणध्वनी) सर्व मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. पोलिसांच्या तत्पर कारवाईने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी उपस्थितांशी संवाद साधताना कोणतीही सापडलेली वस्तू स्वतःकडे ठेवणे ही एक सामाजिक अप्रवृत्ती असून, यामध्ये सामाजिक प्रबोधनाची आवश्यकता आहे , असे सांगितले . यावेळी पोलिस अधिकारी, अंमलदार यांची उपस्थिती होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा