रत्नागिरी: महामार्गांवरील अपघात टाळण्याकरिता, पोलीस अधीक्षकांनी घेतली तातडीची बैठक

रत्नागिरी,२३ जानेवारी २०२३ :रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील, रेपोली येथील मुंबई – गोवा महामार्गावर ट्रक व कार या दोन वाहनांमध्ये १९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात होऊन दहा जण जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या अपघातामध्ये चार महिलांचा व दोन लहान मुलांचा देखील समावेश होता.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. भविष्यात या मार्गावरील असे भीषण अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग संबंधित सर्व भागधारक कंपनीच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत.

यामध्ये कंपनीला महत्वाच्या ठिकाणी फलक लावणे, संकेतदर्शक बसवणे, परावर्तक आणि चेतावणी दर्शक दिवे लावण्याच्या सूचना केल्या. त्याचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे. तसेच, शासकीय यंत्राणेलाही, महामार्गावरील सामग्री चोरीला जाणार नाही व गेल्यास त्याबाबत पाठपुरावा घेण्याबाबत निर्देशही देण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा