KYC नियमांचे पालन करण्यात ढिलाई दिल्याने आरबीआयने ॲक्सिस बँकेवर आकारला दंड

नवी दिल्ली, ३ सप्टेंबर २०२१: ॲक्सिस बँकेवर दंड: केवायसी नियमांचे पालन करण्यात ढिलाई केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेवर कारवाई केली आहे.  रिझर्व्ह बँकेने यासाठी ॲक्सिस बँकेला २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी सांगितले की,  ॲक्सिस बँक लिमिटेड वर २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नो युवर कस्टमर (केवायसी) च्या काही तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे.
 पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की फेब्रुवारी आणि मार्च २०२० दरम्यान ॲक्सिस बँकेच्या एका ग्राहकाच्या खात्याची चौकशी करण्यात आली.  तपासादरम्यान असे आढळून आले की आरबीआयच्या केवायसी निर्देश, २०१६ मधील तरतुदींचे पालन करण्यात बँक अपयशी ठरली.
 काय म्हणाली आरबीआय?
 निवेदनात म्हटले आहे की, संबंधित खात्याच्या संदर्भात योग्य ती काळजी घेण्यात बँक अपयशी ठरली.  यामुळे बँक ग्राहकाच्या खात्यातील व्यवहार त्याच्या व्यवसायाशी आणि जोखीम प्रोफाइलशी सुसंगत असल्याची खात्री करू शकली नाही.  या संदर्भात आरबीआयने बँकेला नोटीस दिली आहे.  नोटीसचे उत्तर आणि तोंडी स्पष्टीकरण लक्षात घेऊन दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
 केवायसी म्हणजे काय
 KYC चे पूर्ण रूप म्हणजे Know Your Customer.  याचा अर्थ आपल्या ग्राहकाबद्दल जाणून घेण्यासाठी तपशील किंवा फॉर्म.  केवायसी हा एक फॉर्म आहे जो ग्राहकाबद्दल माहिती देतो.  या फॉर्ममध्ये ग्राहक स्वतःबद्दल सर्व आवश्यक माहिती भरतो.  या केवायसी फॉर्ममध्ये ग्राहकाला त्याचे नाव, बँक खाते क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पूर्ण पत्ता भरावा लागतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा