रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोरोना पॉझिटिव्ह…

13

नवी दिल्ली, २६ ऑक्टोंबर २०२०: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सोमार आले आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ते एसिम्टोमैटिक आहेत आणि ठीक आहेत. ते म्हणाले की, अलिकडच्या काळात जे लोक माझ्यासोबत संपर्कात आले होते ते देखील घरातच विलगीकरणात राहून आपले काम सुरु ठेवतील.

ते म्हणाले की, आरबीआयमधील काम सामान्यपणे सुरू होईल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी सर्व डेप्युटी गव्हर्नर व इतर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अलीकडंच शक्तीकांत दास म्हणाले होते की कोरोना कालावधीत देशाच्या अर्थव्यवस्थेवरील पसरलेले संकट दूर होत आहे व अर्थव्यवस्था पूर्ववत स्थितीत येत आहे.

ते म्हणाले होते की, “आरबीआय आणि केंद्र सरकारच्या निर्णयांमुळं भारत आर्थिक रिकव्हरिच्या उंबरठ्यावर उभा आहे. शक्तीकांत दास म्हणाले, आम्ही जवळजवळ आर्थिक पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहोत. अशा परिस्थितीत आर्थिक मापदंडांच्या वाढीस आधार देण्यासाठी पुरेसे भांडवल असणे आवश्यक आहे. ”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे