RCB चा या हंगामातील चौथा विजय, दिली 16 धावांनी पराभूत

RCB vs DC, 17 एप्रिल 2022: आयपीएल 2022 च्या 27 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा 16 धावांनी पराभव केला. दिल्लीसमोर 190 धावांचं लक्ष्य होतं आणि संघाची सुरुवातही उत्कृष्ट झाली. 94 धावांवर डीसीची दुसरी विकेट पडली आणि संघ विजयासाठी फेव्हरिट ठरला.

मात्र, यानंतर एकामागून एक विकेट गमावत संघाला 20 षटकांत 7 विकेट्सवर 173 धावाच करता आल्या. डेव्हिड वॉर्नरने (66) सर्वाधिक धावा केल्या. त्याचवेळी आरसीबीकडून जोश हेझलवूडने 4 बळी घेतले. आरसीबीचा हा 6 सामन्यांमधला चौथा विजय आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा 5 सामन्यांमधला तिसरा पराभव आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 189 धावा केल्या. दिनेश कार्तिकने 34 चेंडूत नाबाद 66, तर शाहबाज अहमदने नाबाद 32 धावा केल्या. डीसीकडून शार्दुल, कुलदीप, अक्षर आणि खलील यांनी 1-1 बळी घेतला.

हेजलवूडच्या खात्यात 3 बळी

जोश हेझलवूडने शानदार गोलंदाजी करताना 4 षटकांत 3 बळी घेतले. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने रोव्हमन पॉवेल (0), ललित यादव (1) आणि शार्दुल ठाकूर (17) यांना बाद केलं. सामन्यात त्याने 7.25 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या.

वॉर्नरचे 52वे अर्धशतक

डेव्हिड वॉर्नरने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 52 वे अर्धशतक 29 चेंडूत पूर्ण केलं. 38 चेंडूत 66 धावा केल्यानंतर हसरंगाच्या चेंडूवर वॉर्नर एलबीडब्ल्यू आऊट झाला. अंपायरने वॉर्नरला नॉटआऊट दिलं, पण आरसीबीने रिव्ह्यू घेतला. चेंडू थेट पॅडवर गेल्याचे रिप्लेमध्ये दिसून आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा