गोल पोस्ट अर्थ उद्योग आरकॉम” चे संचालक अनिल अंबानी यांचा राजीनामा

आरकॉम” चे संचालक अनिल अंबानी यांचा राजीनामा

मुंबई : कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या (आरकॉम) संचालक अनिल अंबानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे . अनिल अंबानी यांच्याबरोबरच छाया विराणी, रायना करानी, मंजरी केकर, सुरेश रंगाचार यांनी देखील संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. रेग्युलेटरी फाइलिंग मिटिंगमध्ये त्यांनी याबाबतची घोषणा केली असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.
“आरकॉम” ही सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. त्यामुळे स्वीडनची टेलिकॉम कंपनी एरिक्सन थकीत रक्कम प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर कंपनीने सर्व देणी पकडून जुलै – सप्टेंबर तिमाहीत ३०.१४२ कोटींचा तोटा झाल्याचे सांगितले आहे. तशी नोंद ही करण्यात आली आहे. यावरून अनिल अंबानी आणि त्यांच्या संचालक मंडळाने राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

error: Content is protected !!
Exit mobile version