ब्रिटन १८ ऑक्टोबर, २०२२ : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची लढत गाजली. ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यातली लढत हा जगभरात चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर अनेक चढाओढीने अखेर लिझ ट्रस यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. पण आता चाळीस दिवसांमध्ये ट्रस यांना खुर्ची खाली करावी लागणार असं दिसतंय. त्यामुळे पुन्हा एकदा ऋषी सुनक यांना संधी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
लिझ ट्रस यांच्या पक्षाअंतर्गत मतभेद झाले असून त्यांच्या पक्षातले १०० सदस्य अविश्वासाचा ठराव मंजूर करु शकतात. त्यामुळे लिझ ट्रस यांना खुर्ची रिकामी करावी लागू शकते. त्यामुळे २४ ऑक्टोबर हा लिझ ट्र्स यांच्या राजकारणातील पंतप्रधान पदाचा शेवटचा दिवस असू शकतो.
ट्रस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, असा दावा त्यांच्याच पक्षाचे सदस्य करत आहे. त्यांनी जाहीर केलेल्या मिनी अर्थसंकल्पामुळे देश अडचणीत येत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याच पक्षाकडून होत आहे.
या संदर्भात कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य बैठक घेणार असून ते ट्रस यांचा दावा भक्कम ठरवणार आहे. पण तत्पूर्वीच ऋषी सुनक यांचा दावा भक्कम ठरवला असून ते ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात, असा विश्वास जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या घटनेवर जोरदार बेटिंग होत असून त्यातून आता ऋषी सुनक यांच्या नावावर जास्त पॉईंटचे बेटिंग सुरु आहे. त्यामुळे जर ऋषी सुनक पंतप्रधान झाले तर बुकींचे सोने नक्की होणार, हे खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस