पुणे, २५ ऑगस्ट २०२१ : Realme C21Y सोमवारी भारतात लॉन्च करण्यात आला. हा कंपनीचा देशातील नवा अफोर्डेबल स्मार्टफोन आहे. 5,000 mAh ची बॅटरी आणि सुपर नाईटस्केप कॅमेरा मोड सारखे फीचर्स या फोन मध्ये देण्यात आले आहेत. Realme चा हा नवीन स्मार्टफोन भारतातील Redmi 9, Infinix Hot 10S आणि Nokia G20 सारख्या फोनशी स्पर्धा करेल.
भारतात Realme C21Y ची किंमत 3GB + 32GB व्हेरिएंटसाठी ८,९९९ रुपये आणि 4GB + 64GB व्हेरिएंटसाठी ९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा क्रॉस ब्लॅक आणि क्रॉस ब्लू कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ग्राहक ३० ऑगस्टपासून रिअलमीच्या अधिकृत साइट फ्लिपकार्ट आणि निवडक ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांकडून फोन खरेदी करू शकतील.
Realme C21Y ची वैशिष्ट्ये
ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन अँड्रॉइड ११ आधारित Realme UI वर चालतो आणि ६.५-इंच HD + (720×1,600 पिक्सेल) डिस्प्ले आहे. हा ऑक्टा-कोर Unisoc T610 प्रोसेसरद्वारे ४ जीबी रॅम आणि Mali-G52 GPU सह उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी 13MP प्राइमरी कॅमेरा, 2MP मोनोक्रोम सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा त्याच्या मागील बाजूस देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी समोर ५ एमपी कॅमेरा आहे.
Realme C21Y ची इंटरनल मेमरी 64GB आहे, जी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, हे 4G LTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth v5.0, GPS/A-GPS, Micro-USB आणि 3.5mm हेडफोन जॅकला सपोर्ट करतो.
Realme C21Y च्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनची बॅटरी 5,000mAh आहे आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला देखील सपोर्ट आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे