पुणे, ८ एप्रिल २०२२: Realme ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 2 Pro लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन आधीच चीन आणि जागतिक बाजारात लॉन्च करण्यात आलाय. कंपनीने हा फोन भारतात आकर्षक किंमतीत लॉन्च केलाय. यात 2K AMOLED डिस्प्ले, उच्च रिफ्रेश रेट, AMOLED पॅनल, Sony चा टॉप-क्लास कॅमेरा सेन्सर आणि Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आहे.
हँडसेटमध्ये ६५W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेत या फोनच्या माध्यमातून कंपनी वनप्लस आणि सॅमसंगच्या प्रीमियम फोनला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या खास गोष्टी.
Realme GT 2 Pro ची भारतात किंमत
रियालिटीचा हा फोन भारतातील सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. Realme GT 2 Pro च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे, तर त्याच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५७,९९९ रुपये आहे.
तथापि, आपण हा स्मार्टफोन इंट्रोडक्ट्री प्राइसवर खरेदी करू शकता. तुम्ही फोनचा बेस व्हेरिएंट ४४,९९९ रुपयांना आणि टॉप व्हेरिएंट ५२,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. हँडसेट पेपर ग्रीन, स्टील ब्लॅक आणि पेपर व्हाइट या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आलाय.
त्याची पहिली विक्री १४ एप्रिलपासून सुरू होईल. दुपारी १२ वाजता तुम्ही फ्लिपकार्टवरून फोन खरेदी करू शकाल. यासोबत तुम्हाला ४,९९९ रुपयांचा Realme Watch S मोफत मिळंल. तसेच, वापरकर्त्यांना HDFC बँक कार्डवर ५,००० रुपयांचा झटपट कॅशबॅक मिळंल.
डिटेल्स
Realme GT 2 Pro ला 6.7-इंचाची LTPO2 AMOLED स्क्रीन मिळते, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. हँडसेटमध्ये HDR 10+, 1400 Nits चा पीक ब्राइटनेस यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे, जो खूप फास्ट आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शन साठी गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देण्यात आला आहे.
फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्याची मुख्य लेन्स 50MP Sony IMX766 सेन्सर आहे. यामध्ये OIS, EIS सपोर्ट उपलब्ध आहे. हँडसेट 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मायक्रोस्कोप लेन्ससह येतो. फ्रंटमध्ये कंपनीने 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.
डिव्हाइस Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर काम करते, जे 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येते. यामध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट दिलेला नाही. हँडसेट Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे