Realme चा पाहिला लॅपटॉप Slim ची विक्री सुरू, ३००० रुपयांपर्यंत सूट

पुणे, ३१ ऑगस्ट २०२१: Realme चा पहिला लॅपटॉप Realme Book Slim आज पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध होईल.  Realme च्या या नवीन लॅपटॉपमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.  यात 2k डिस्प्ले आणि 11th Gen Intel Core i5  प्रोसेसर आहे.  याचा अर्थ याच्या स्क्रीनची कॉलिटी खूप चांगली असणार आहे आणि परफॉर्मन्स देखील चांगला असेल.
 लॉन्चच्या वेळी कंपनीने म्हटले होते की Realme Book Slim लॅपटॉप मॅकबुक प्रो पेक्षा पातळ आणि मॅकबुक एअरपेक्षा हलका आहे.  Realme Book Slim ची दोन कॉन्फिगरेशन भारतात उपलब्ध करण्यात आली आहेत.
Realme Book Slim ची किंमत
 रियलमी बुक स्लिमच्या पहिल्या मॉडेलमध्ये  Gen Intel Core i3 प्रोसेसर 8GB रॅम आणि 256GB SSD सह देण्यात आला आहे.  त्याची किंमत ४४,९९९ रुपये आहे.  दुसऱ्या व्हेरियंटमध्ये 11th Gen Intel Core i5 प्रोसेसर 8GB रॅम आणि 256GB SSD सह देण्यात आला आहे.  त्याची किंमत ५६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.  Realme Book Slim ची विक्री काल दुपारी १२ पासून सुरु झाली आहे.  आपण ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट, रियलमीचे ऑनलाइन स्टोअर आणि मेनलाइन स्टोअर वरून खरेदी करू शकता.
रिअलमी बुक स्लिम खरेदीवर खरेदीदारांना ऑफर देखील दिली जात आहे.  यावर HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ऑफर दिली जात आहे.  यात ईएमआय पेमेंट पर्याय देखील समाविष्ट आहे.  खरेदीदारांना बेस व्हेरिएंट वर २,००० रुपयांची सूट दिली जात आहे.
Realme Book Slim चे टॉप व्हेरिएंट कार्ड डिस्काउंटसह ५३,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.  म्हणजेच कार्ड वापरल्यास या व्हेरिएंटवर ३,००० रुपयांची सूट दिली जात आहे.  बेस व्हेरियंट कार्ड डिस्काउंटसह ४२,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.
Realme Book Slim ची वैशिष्ट्ये
Realme Book Slim मध्ये 14-इंच IPS डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2160×1440 पिक्सेल आहे आणि 400 nits पीक ब्राइटनेस आहे.  हा लॅपटॉप Windows 10 सह लॉन्च करण्यात आला आहे परंतु कंपनीने सांगितले की ते Windows 11 मध्ये अपग्रेड केले जाऊ शकते.
 ग्राफिक्स कामगिरीसाठी, Core i3 वर्जन Intel UHD Graphics ला GPU प्रमाणे वापर करतो.  Core i5 चिपसेट ला Intel Iris Xe Graphics सह जोडलेले आहे.  ते वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6  आणि Bluetooth 5.2  सपोर्टसह येतात.  यात 54Wh ची बॅटरी आहे.  कंपनीचा दावा आहे की त्याची बॅटरी सामान्य स्थितीत ११ तासांचा प्लेबॅक वेळ देते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा