दिलासादायक… राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट

8

मुंबई, १५ मे २०२१: राज्यात कोरोनाचा हाहाकार चालू आहे. पण त्यामध्ये ही एक दिलासादायक बाब समोर आलीय. ती म्हणजे राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट सुरू आहे. ही बातमी महाराष्ट्रासाठी आनंदाची जरी असली तरी अजून ही राज्यातील धोका टळलेला नाही. अधिक धोका आसलेल्या मुंबई आणि पुण्यासाठी देखील एक आनंदाची बातमी आहे.

मुंबई पुण्यात घट…..

मुंबई मधे पुन्हा एकदा नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालीय. मुंबईमध्ये १६५७ नवे रुग्ण आढळले तर २५७२ कोरोनामुक्त रुग्ण झालेत. सध्या मुंबईत ३७ हजार ६५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर मुंबई चा डबलिंग रेट आता ९९ दिवसांवर गेला असून बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांपर्यंत गेलंय.

पुण्यामधे १८ एप्रिलपासून नवीन होणाऱ्या रुग्णसंख्येत घट कायम आहे. पुण्यात शुक्रवारी १ हजार ८३६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून दिवसभरात ३ हजार ३१८ बाधितांना डिस्चार्ज आला देण्यात आलाय. तर आत्तापर्यंत ४ लाख २४ हजार ९९० रुग्णांना डिस्चार्ज दिलाय.

राज्याची स्थिती…..

राज्यात शुक्रवारी ५३,२४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले असून आजपर्यंत ४७,०७,९८० रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर राज्यात ३९,९२३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६९५ जणांचा मृत्यू झालाय. राज्याचा रिकव्हरी रेट हा ८८.६८% इतका आहे तर मृत्यू दर १.५% इतका आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत ३,०६,०२,१४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,०९,२१५ नमुने पाॅजिटिव्ह आले आहेत. राज्यात शुक्रवारपर्यंत ५,१९,२५४ कोरोना रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव