मास्क न घातल्याने आमदाराच्या वाहन चालकाकडून केला दंड वसूल

श्रीरामपुर,दि.३० एप्रिल २०२०: कोरोनोच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये शहर पोलिस,व नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनांची कठोर अंमलबजावणी सुरु केली आहे.
त्याच्याच एक भाग म्हणून मास्क न लावता गाडी चालवणारे आमदार लहु कानडे यांच्या गाडी चालकाकडून सुद्धा दंड आकारुन त्याच्याकडुन पाचशे रुपयांची वसुली नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली.

सध्या पोलिस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन हे संयुक्तपणे शहरांमध्ये जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. दररोज सकाळी शहराच्या वेगवेगळ्या भांगामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या व मास्क न लावणाऱ्या व रस्त्यावर थुंकणाऱ्या गावकऱ्यांकडून दंड वसुल केला जात आहे. यासाठी नगरपालिकेने चार तुकड्या तयार केल्या आहेत. सकाळच्या सत्रात हे काम सुरु असून दिवसभर हे करण्यात यावे अशी, मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.

शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट तसेच नगरपालिकेचे मुख्यधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य अधिकारी प्रकाश जाधव आरोग्य अधिकारी आरणे, पालिकेचे कर्मचारी व पोलिस अशा दोन्ही यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करत आहे.
राज्यामध्ये सर्वत्र कोरोनोचे थैमान सुरु असताना स्थानिक अधिकाऱ्यांचे उत्कृष्ट नियोजनामुळे शहरांमध्ये कुठे हि कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. यासाठी पुरेपुर काळजी घेतली जात आहे.

सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याची चर्चा सूरु असून त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही. यासाठी पोलिस, पालिका प्रशासनाने शहरांमध्ये, येणाऱ्या लोकांची नाकाबंदी करावी, इतर लोकांना शहरात येऊ देऊ नये, तसे कारण असल्याशिवाय कोणालाही जाण्या – येण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

शहरांमध्ये रमजान सुरु असून वार्ड नंबर २ मध्ये संध्याकाळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर दिसून येतात. बुधवारी ( दि.२९) रोजी संध्याकाळी पोलिसांनी वार्ड नंबर २ मिलत नगर या भागामध्ये गस्त घालून बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरात घरात जाण्याचे आवाहन केले. मात्र पोलिस गेल्यानंतर लोक बाहेर येतात. त्यासाठी शहर पोलिसांनी वार्ड नंबर, २ चौका चौकामध्ये पांईट तयार करुन, रमजान ईद होईपर्यंत तेथे लक्ष द्यावे, तसेच लोकांनी बाहेर न येण्याची काळजी घ्यावी व आपले रक्षण आपण करावे, तसेच पोलिस प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन शहर पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांनी केले आहे.

शहरात पोलिस रात्रंदिवस शहरांमध्ये गस्त घालत आहेत. परिस्थिती नियंत्रण ठेवीत आहेत त्याबद्दल शहर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: दतात्रय खेमनर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा