कोविडमुळे मार्च पासून थांबलेली वसुलीची कामे आता सुरू होणार

6

बारामती, १३ ऑक्टोबर २०२०: बारामती तालुक्यातील असणाऱ्या २८३ पतसंस्थांच्या निवडणूका या जानेवारी २०२० ला होणार होत्या, मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणूका डिसेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. सध्या मागच्या सत्रातील संचालक मंडळीच संस्थेचे कामकाज पाहात आहेत.

बारामती तालुक्यातील पतसंस्थांच्या निवडणुका कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्या. वास्तविक या निवडणुका जानेवारी २०२० मध्ये झाल्या पाहिजे होत्या. परत एप्रिल मध्ये होणार होत्या पण, कोरोना कमी होत नसल्याने त्या आता डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तालुक्यातील एकूण ९६७ संस्थानपैकी २८३ संस्थांच्या निवडणूका डिसेंबर अखेर शासनाच्या आदेश मिळाल्यास होणार आहेत.

सध्या पतसंस्थेवर असणारे अध्यक्ष व संचालक मंडळ आहे. त्यांना कोरोनामुळे एक वर्ष जास्तीचा कारभार मिळाला आहे. आता होणाऱ्या निवडणुकीपर्यंत हे मंडळ कार्यरत राहणार आहे. तसेच संस्थेचे सर्व अधिकार त्यांना राहणार आहेत.

सध्याच्या कोरोनामुळे व्यवसाय ठप्प असल्याने संस्थानची वसुली मंदावली आहे. याचा संस्थेच्या नफा नुकसानावर परिणाम होणार आहे. शासनाने सप्टेंबरपर्यंत दिलेल्या आदेशात निवडणुकीच्या काळात गर्दी होते. फॉर्म भरायला गर्दी, प्रचार सभा, मतदारांना जाऊन भेटणे, मतदान मोजणीच्या दिवशी गर्दी होते.

कोरोना संसर्गाच्या काळात याचा प्रादुर्भाव वाढू नये त्यामुळे निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. पतसंस्थानची कामे सुरू झाली आहेत. मार्च महिन्यात कोविडमुळे थांबलेली वसुलीची काम आता सुरू होणार आहेत. डिसेंबर २०२० शासनाच्या आदेशाची वाट बघत आहे. जर कोरोना संसर्ग नसता तर आता पर्यंत शंभर संस्थांच्या निवडणूका झाल्या असत्या असे सहाय्यक निबंधक कुंभार यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा