एसबीआय बँकेत लवकरच सुरू होणार भरती

मुंबई, ८ सप्टेंबर २०२०: स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येत असून लवकरच नवीन कर्मचाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. एसबीआय मध्ये लवकरच नवीन कर्मचाऱ्यांसाठी भरती सुरू होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

एसबीआय ही बँक देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. एसबीआय बँकेने आज जुन्या ३० हजार कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्त जागांवर ताज्या दमाचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. एसबीआय ही कर्मचारी-फ्रेंडली आणि विस्तार करणार असल्याने, पुढील तीन महिन्यात जुन्या कर्मचाऱ्यांच्या जागी १४ हजार नविन कर्मचारी भरती केले जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान ३१ मार्च २०२० पर्यंत एस. बी. आय. च्या कर्मचाऱ्यांची संख्या २.४९ लाख इतकी होती. बँकेने ३० हजार १९० कर्मचाऱ्यांना व्ही. आर. एस. देण्याचा निर्णय घेतला आहे. यात ११ हजार ५६५ अधिकारी आणि १८ हजार ६२५ कर्मचारी यांचा समावेश असेल. तसेच बँकेने व्ही.आर. एस. साठीचा आराखडा तयार केला असून तो बोर्डाची मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.

दरम्यान, ३१ मार्च २०१९ मध्ये एसबीआय बँकेची कर्मचारी संख्या २.५७ लाख इतकी होती, आता ३१ मार्च २०२० मधे २.४७ लाख इतकी आहे. खर्च कमी करण्यासाठी बँकेने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे दोन हजार कोटी रुपये वाचतील असा अंदाज बँकेने वर्तवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा