तमिळनाडूमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी; सर्व शाळांना सुट्टी जाहीर

तमिळनाडू, ११ नोव्हेंबर २०२२: गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडूमध्ये पावसाचा कहर सुरुच आहे. हवामान खात्यानं आज तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि राणीपेट जिल्ह्यांसाठी तर उध्या दिंडीगुल, धेनी आणि निलिगिरीस जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय. हवामान विभागानं सुरक्षतेच्या कारणास्तव तमिळनाडूतील काही जिल्ह्यांमधील शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीय.

मुसळधार पावसामुळं पुद्दुचेरीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्यांनं शहरातील स्थिती जलमय झाली असून, त्यांमुळं राज्यातील पावसाच्या पार्श्वभुमीवर पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रागास्वामी यांनी देखील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीय. अनेक जिल्ह्यांमधील पावसामुळं शनिवार आणि रविवारी होणाऱ्या टंकलेखन परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहेत.

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळील नैऋत्य बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. या क्षेत्रात पुढील चोवीस तासांत कमी दाबाचा प्रभाव हा अधिक जास्त असल्यानं तमिळनाडूसह काही राज्यांत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा