पुणे, १ डिसेंबर २०२१ : Redmi Note 11T भारतात लॉन्च झाला आहे. सुरुवातीची किंमत १६,९९९ रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. Redmi Note 11 सीरीज चीनमध्ये गेल्या महिन्यात लॉन्च करण्यात आली होती.
Redmi Note 11 चे तीन मॉडेल चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. भारतात फक्त बेस मॉडेल ऑफर केले जाते. मात्र भारतात कंपनीने Redmi Note 11 मध्ये फक्त T वेगळेपणा दाखवण्यासाठी जोडला आहे. Redmi Note मालिकेला सामान्यतः कमी किमतीत अधिक मूल्यासाठी विचारात घेतले जाते, परंतु Redmi Note 11T ची किंमत इतर नोटच्या बेस व्हेरियंटपेक्षा खूप जास्त आहे.
Redmi Note 11T चे तीन प्रकार भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. 6GB RAM 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे, 6GB RAM 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आहे, तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे.
Redmi Note 11T 5G ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याची विक्री ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन Xiaomi च्या वेबसाइट आणि Amazon India सह रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असेल.
Redmi Note 11T लाँच ऑफर म्हणून तुम्हाला रु. १,००० ची सूट मिळू शकते. यासाठी तुमच्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे.
Redmi Note 11T फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 11T मध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. आस्पेक्ट रेशो २०:९ आहे आणि त्यात ९०Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. Redmi Note 11T मध्ये MediaTek Dimensity ८१० चिपसेट देण्यात आला आहे. यात रॅम बूस्टर फीचर देखील आहे, ज्याला कंपन्या व्हर्चुअल रॅम देखील म्हणतात.
Redmi Note 11T मध्ये ड्युअल रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. प्राथमिक लेन्स ५० मेगापिक्सेल, दुसरी ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड लेन्स आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये १६ – मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Redmi Note 11T मध्ये मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. यात हेडफोन जॅक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. फोनमध्ये 5G सह इतर मानक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. Redmi Note 11T मध्ये ३३W प्रो फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,००० mAh बॅटरी आहे. पूर्ण चार्ज केल्यावर दोन दिवस चालवता येईल असा कंपनीचा दावा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे