देशांतर्गत किंमती कमी करण्याच्या उद्देशाने खाद्यतेलांच्या आयातीवरील करात कपात

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर २०२१: खाद्यतेलाच्या देशांतर्गत किंमती नियंत्रित करण्यासाठी सरकारने विविध खाद्यतेलांच्या आयातीवरील करात कपात केली आहे. कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क १०% वरून २.५%, तर कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील शुल्क ७.५% वरून २.५% आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. रिफाईंड पाम तेल, रिफाईंड सोयाबीन तेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेलाचे आयात शुल्क ३७.५% वरून ३२.५% वर आणण्यात आले आहे.

काल ११ सप्टेंबर २०२१ पासून शुल्कातील कपात लागू आहे. खाद्यतेलांच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेषत: फेब्रुवारी २०२१ पासून सरकार करत असलेल्या विविध प्रयत्नांचा हा भाग आहे.

खाद्यतेलांच्या आयातीवरील शुल्क कपातीमुळे या वस्तूंच्या देशांतर्गत किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे ग्राहकांना वाजवी किंमतीत या वस्तू उपलब्ध होतील.नव्या अधिसूचनेनुसार, आयात शुल्काचे पूर्वीचे आणि सध्याचे दर खाली दिले आहेत. आयात शुल्क कमी करण्याबरोबरच, कच्च्या पाम तेलासाठी कृषी उपकर १७.५% वरून २०% करण्यात आला आहे.

खाद्यतेलांवरील आयात शुल्कात सध्या केलेली कपात संपूर्ण वर्षासाठी १,१०० कोटी रुपये आहे. सरकारद्वारे दिलेल्या शुल्काच्या अनुषंगाने पूर्वीच्या शुल्कामधील कपात धरून ग्राहकांपर्यंत ४,६०० कोटी रुपयांचा लाभ पोहोचणे अपेक्षित आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा