महिला सुरक्षितते संदर्भात अंकिता पाटील यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट…

इंदापूर, ८ ऑक्टोबर २०२०: महिला सुरक्षा तसेच महिला व युवती यांच्यावर वारंवार होणारे अत्याचार, हल्ले व त्यासंदर्भातील उपाययोजना याबाबत पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांची दि. ७ ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेतली व चर्चा केली. यावेळी युथ कनेक्टच्या स्नेहल शिवाजी बांगर उपस्थित होत्या.

अंकिता पाटील म्हणाल्या की, ‘स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे, ती पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून दिली आहे. परंतु नोंद होणाऱ्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे नोंद न होणाऱ्या घटनांचीही संख्या जास्त आहे. आकडेवारीवरून एक नजर टाकली तर स्त्री अत्याचाराचे भीषण वास्तव दिसून येईल. स्त्रियांवरील अन्याय,अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच, परंतु त्याबरोबरच आवश्यक आहे ती जनजागृती.’

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील लिखित विधानगाथा हे पुस्तक अंकिता पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेशजी देशमुख यांना भेट दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा