पुणे, २६ ऑगस्ट २०२२: विश्रांतवाडी येथील प्रभारी सबरजिस्टर अमित अविनाश राउत (रा. पिंपरी) यांनी तुकडेबंदी कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करून आर्थिक लाभाकरिता २४ खरेदीखत केल्याचे उघडकीस आले.
अमित राउत यांना निलंबित करण्यात यावे, म्हणून असा प्रस्ताव नोंदणी उपमहानीरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक यांच्याकडे पाठविला आहे. वर्ग १ नोंदणी महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार सह जिल्हा निबंध तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी चवकशी अहवाल तयार केला आहे. दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राउत हे सुट्टीवर गेले.
विश्रांतवाडी येथील हवेली सह दुयम निबंधक वर्ग २ हवेली क्रमांक आठचा प्रभारी सबरजिस्टर म्हणून काही दिवस कार्यभार होते. अमित राउत हे वरिष्ठ लिपिक असून पाखरे यांनी तयार केलेल्या अहवालात असे म्हंटले आहे. आर्थिक लाभाकरिता ८ ऑगस्ट २०२२ रोजी राउत यांनी वयक्तिक तुकडेबंदी सर्व कायद्याचे, नियमांचे उल्लंघन करून एका दिवसात २४ दस्तांची नोंदणी केल्याचे समोर आहे.
सह जिल्हा निबंधक अनिल पारखे यांच्या आदेशानुसार नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्याकडे अनेकांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी कार्यालयातील दस्तांची तपासनी सुरू केली. प्रभारी अमित राउत यांनी झालेल्या चवकशित वाघोली, वडकी, केसनंद, लोणीकंद आदी पुणे शहर उपनगरालगतच्या परिसरातील जागेची बेकायदेशीर नोंदणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तसेच तपासणी झाल्यानंतर दस्त तपासणीत ८ परीच्छे दांमध्ये १३ लाख ४४ हजार ९०० रुपये इतके कमी शुल्क आकारल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच शेती व ना – विकास झोन दाखले जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध असताना दस्तावेजास भाग करण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सूरज गायकवाड