रेशन दुकानात आता मिळणार शालेय साहित्य .

पुणे: रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी दुकानांमध्ये स्टेशनरी वस्तू व शालेय उपयुक्त साहित्य विक्रीस ठेवण्यात सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे आता रेशनच्या दुकानात शालेय साहित्यही उपलब्ध होणार आहे.
दरम्यान या वस्तूंचे दुकानापर्यंत वितरण व विक्री पोटी मिळणारे कमिशन याबाबत रेशन दुकानदारांनी संबंधित कंपनीच्या वितरकांची परस्पर संपर्क साधावा, हा व्यवहार संबंधित कंपनी व त्यांचे घाऊक व किरकोळ व्यापारी आणि रेशन दुकानदार त्यांच्यामध्ये राहील यात सरकारचा कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा