पु.ल एके काळी म्हणायचे,”पुण्यात दुकानातील सर्वात दुर्लक्षित वस्तु म्हणजे दुकानात आलेले गिर्हाईक”आणि आता बर्याच काळानंतर पुण्यातील पेठांमधील अस्सल पुणेकर काही नावाजलेल्या दुकानदारांमधे ही “ही तूसडेपणाची वृत्ती” उफाळून आली आहे असे ह्या करोनाच्या काळात दिसत आहे. आता हळूहळू लॉकडाउन उठत आहे,दुकाने उघडत आहेत…पण काही दुकानांचे मालक,कर्मचारी ग्राहकांबरोबर अतिशय संकोचीत वृत्तीने वागत आहेत.एक तर जे काही घ्यायचे ते दुकानाच्या बाहेर एखाद्या “अस्पृश्या”सारखे उभे राहुन..हरकत नाही,साथीचे दिवस आहे समजू शकतो आपण…पण ते दुकानदार आलेल्या ग्राहकाकडे इतक्या संशयित आणि कुच्छीत नजरेने बघतात की जणू त्या ग्राहकाला करोना झालेलाच आहे.त्यात तो ग्राहक चुकुन शिंकला-खोकला तर त्याचे काही खरे नाही…!!महामारी काय आज आहे,उद्या ती जाईल ही….पण ह्या “अस्सल पुणेकर” दुकानदारांनी जर आपली संकुचितवृत्ती सोडून आलेल्या ग्राहकाशी जरा खेळीमेळी ने वागले तर चालणार नाही का….????