रुग्णाच्या नातेवाईकांना हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण 

पुरंदर दि.२३ सप्टेंबर २०२० : पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये धन्वंतरी हॉस्पिटलच्या टेक्नेशियनने कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबातची तक्रार सासवड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे, अजिंक्य पवार यांनी याबाबतची तक्रार दिली आहे.
याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी अजींक्य अशोक पवार रा.पवारवाडी यांचा भाऊ हा १२ सप्टेंबरला  कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यास उपचारासाठी धन्वंतरी हॉस्पिटल, सासवड येथे दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर धन्वंतरी हॉस्पिटल येथे उपचार चालू होते. उपचाराअंती २० सप्टेंबरला कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने हॉस्पिटल मधून डीचार्ज देण्यात येणार होता.२० सप्टेंबरला  सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पवार यांच्या  भावाला धन्वंतरी हॉस्पिटल सासवड येथून डिस्चार्ज देणार होते. म्हणून पवार व त्याचा मित्र हॉस्पिटलचे बिल किती झाले आहे ते बील भरून भावास घरी नेणार होते. झालेल्या बिला बाबत माहिती घेण्यासाठी धन्वंतरी  हॉस्पिटल मधील लॅब टेक्नीशियन अशोक घाडगे यांच्याकडे ते गेले असता, पवार यांनी आतापर्यंत हॉस्पिटलचे बिल किती झाले ? आमचे किती पैसे जमा आहेत ? मला झालेल्या  उपचाराचे सर्व बिल द्यावे ? असे प्रश्न विचारले.त्याच बरोबर बिला व्यतिरिक्त ज्यादाचे पैसे कशाचे द्यायचे? याबाबत विचारणा केली असता अशोक घाडगे यांनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करून जीवेमारण्याची धमकी देवू लागला. तुम्ही मला शिव्या का देत आहे असे फिर्यादीने विचारले असता,अशोक घाडगे यांनी  रुमच्या बाहेर जावून, हातात एक लाकडी दांडके घेवून  कारण नसताना फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारले. त्यामुळे डोक्यातून रक्त येवू  लागले.
त्यानंतर फिर्यादीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन सासवड पोलिस स्टेशन येथे जाऊन अशोक घाडगे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पुरंदर तालुक्यातील काही खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूट होत असल्याच्या उलट-सुलट चर्चा सध्या तालुक्यात रंगताहेत. मात्र आता अशा प्रकारे रुग्णांच्या नातेवाइकांना मारहाण करून दबाव आणण्याचे नवीनच प्रकार  सुरू झाले की काय असा प्रश्न लोकांमधून उपस्थित होत आहे.
यावर डॉ.अमोल हेंद्रे म्हणाले की रुग्णाला बिल हे आम्ही शासकीय दरा प्रमाणेच आकारले आहे. ९ दिवसाचे बिल आम्ही केवळ ६० हजार दिले आहे.मात्र या मुलाने जास्त खळखळ घालून बिल करणाऱ्या व्यक्तीला त्रास दिला.स्थानिक लोक असल्यामुळे बिल कमी करण्यासाठी रुग्णालयावर दबाव आणला जातो.
शासन नियमांपेक्षा ज्यादा बिल आम्ही आकारत नाही. मग आम्ही बिल कसे कमी करायचे? आधीच आमच्या डोक्यावर कोवीड रुग्णांवर उपचार करण्याचे टेंशन असतं. त्यातच रुग्णाचे नातेवाईक वाद घालतात. यातून हा प्रकार घडला असावा.आमच्या कर्मचाऱ्याने त्याला मारायला नको होते.आम्ही बिल ज्यादा घेत नाही. लोकांनीही आम्ही कोणत्या परिस्थितीत काम करतो आहोत हे जाणून आम्हाला समजून घ्यावे. किंवा आमचे रुग्णालयच शासनाने घ्यावे.आम्ही रुग्ण सेवेचं काम करू पण हे व्यवस्थापनातील वाद नकोत.
न्यूज अनकट प्रतिनिधी:  राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा