दीड महिन्यांत रिलायन्सच्या शेअर मध्ये १५ टक्क्यांहून अधिक घसरण

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२०: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे का? वास्तविक, रिलायन्सचे शेअर गेल्या दीड महिन्यांत वरच्या स्तरावरून १५ टक्क्यांहून अधिक खाली आले आहेत. गुरुवारी आरआयएलच्या शेअर्समध्ये दबाव दिसून आला, परंतु शेअर बाजार बंद झाल्यावर हा शेअर ०.८७ टक्क्यांनी वधारला आणि २,०२९.०५ वर बंद झाला.

कमकुवत जागतिक निर्देशांमुळं गुरुवारी बाजारात जोरदार विक्री झाली. ट्रेडिंग दरम्यान आरआयएलचे शेअर्सही २००० च्या नीचांकावर पोहोचले. मात्र, शेअर बाजाराचं दिवसाचं कामकाज संपताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स २००० रुपयांवर बंद झाले. जुलैनंतर प्रथमच हा शेअर २००० रुपयांच्या खाली पोहोचला होता.

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने २२ जुलै रोजी प्रथमच २००० रुपयांची पातळी ओलांडली. तथापि, जानेवारीपासून कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना ३३ टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत.

हे ज्ञात आहे की, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरआयएल मधील परकीय गुंतवणूकीत समभागांमध्ये सतत वाढ दिसून येत आहे. १६ सप्टेंबर रोजी आरआयएलचा शेअर २,३६८.८० च्या पातळीवर गेला. जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. यावेळी कंपनीची मार्केट कॅपही १५.४० लाख कोटी रुपयांवर गेली होती.

महत्त्वाचं म्हणजे मार्केट कॅपच्या बाबतीत आरआयएल ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे, जी १५ लाख कोटी रुपयांचा आकडा पार करणारी भारतातील एकमेव कंपनी आहे. पण, गेल्या महिन्याभरापासून समभागात दबाव दिसून येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा