नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२३ :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आर्थिक वर्ष २०२३ – २४ साठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे.
त्यानुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही.
तर नव्या कर श्रेणीत २.५ लाखापासून स्लॅब सुरु झाले होते आता स्लॅबची संख्या पाच पर्यंत कमी करण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील अन्य प्रमुख मुद्दे :
- देशात १५७ नवीन नर्सिंग काँलेज उभारली जाणार.
- ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्त आदिवासी विकास मिशन अंतर्गत होणार
- युवकांना प्रशिक्षणासाठी ३३ स्कील डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी
- एकलव्य निवासी शाळेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार
- ॲग्रीकल्चर क्रेडिट टार्गेट २० लाख कोटी रुपये करण्याचा अर्थसंकल्पात प्रस्ताव
- गरीब कैद्यांच्या जामिनासाठी आर्थिक मदत केली जाणार
- कापसातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे प्रयत्न
- डाळीसाठी विशेष हब तयार करणार.
- पर्यावरण संवधर्नसाठी विशेष प्रयत्न
- हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरला विशेष अनुदान देणार
- ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार
- १० हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटर्सची स्थापना
- पत हमी योजनेसाठी ९ हजार कोटी रुपये दिले जाणार असून, नवीन योजनेंतर्गत, एमएसएमईंना एक टक्क्यांपेक्षा कमी व्याज दिले जाईल.
- रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांचे बजेट
- देशात ४२.७ टक्के करांचे दर आहेत. सरचार्ज रेट ३७ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणण्याची घोषणा.
- ज्येष्ठ नागरिकांना बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा १५ लाखांवरून ३० लाखांवर वाढवण्याची घोषणा.
- पंतप्रधान आवास योजनेच्या निधीमध्ये ६६ टक्क्यांनी वाढ.
- केंद्र सरकार राज्यांना ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची सुविधा एका वर्षासाठी वाढवणार आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.