इंधन कंपन्यांकडून सामान्यांना दिलासा पेट्रोल-डिझेलच्या दरात स्थिरता ठेवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२२ : पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ पाहता जनतेतून नेहमी संताप व्यक्त होताना दिसून येतो. यामध्ये मागील सहा महिन्यांपासून पेट्रोल- डिझेलचे भाव स्थिर होते. त्यामध्ये केंद्र सरकारकडून टॅक्सही कमी करण्यात आला होता; पण महाराष्ट्र सरकारकडून टॅक्स कमी करण्यात न आल्याने
देशात महाराष्ट्र राज्यात पेट्रोल- डिझेलचे सर्वाधिक दर पाहायला मिळत आहेत. साधारणपने प्रतिबॅरलच्या तुलनेत १०० डॉलरच्या जवळपास कच्च्या तेलाची किंमत जाऊन पोचली होती; परंतु दिलासादायक बाब म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना हा क्रूड तेलामध्ये चढ- उताराचा कालावधी मानला जातो. त्यातूनही काही अंशी दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला दैनंदिन व्यवहारात पेट्रोल- डिझेलच्या दरात चढ-उतार होत असल्यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यात सहा महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात स्थिरता पाहायला मिळत आहे. सहा महिन्यांत इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात स्थिरता ठेवली आहे. त्यामध्ये दिल्लीमध्ये पेट्रोलचे ९६.७२, तर डिझेल ८९.६२ रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईत मात्र दिल्लीपेक्षा अधिकचे दर आहेत. मुंबईत
पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९७.२८ रुपये प्रतिलिटर आहे, देशातील मोठ्या शहरांमध्ये मुंबईत सर्वाधिक दर आहेत.

भारतात सरकारी तेल कंपन्यांमध्ये भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्या आहेत, ज्या दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर करतात. प्रत्येक राज्याचा इंधनावरील व्हॅट ठरलेला असतो. त्यामध्ये महाराष्ट्राचा दर सर्वाधिक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटप्रमाणे वेगवेगळे पेट्रोल-डिझेलचे दर असतात.

म्हणूनच केंद्र सरकारतर्फे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. येत्या काळात इंधनाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे इंधनाच्या किमतींत स्थिरता कशी राहील यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा त्यातील एक प्रकल्प आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा