लोणीकंद, दि. १४ ऑक्टोबर २०२०: काल लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रगस्तकामी लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत हजर असताना गुन्हे शोध पथकातील हवालदार बाळासाहेब सकाटे व कॉन्स्टेबल ऋषीकेश व्यवहारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रोहन अभिलाषा सोसायटीजवळ भावडी रोड, वाघोली, येथे काही इसम गॅस सिलेंडर रिफिलींग करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी स्वतः पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रवाना होवून तसेच सदर बाबत तहसिलदार हवेली जिल्हा पुरवठा अधिकारी यांना माहिती दिली.
त्यांनी नियुक्त केलेले पुरवठा निरीक्षक हवेली मंडल अधिकारी वाघोली तलाठी लोणीकंद यांना बातमीचा माहिती कळवून अचानकपणे छापा टाकला असता एम. एस. चौधरी यांचे मालकीचे गट क्र. १५०६ मध्ये एकुण ०६ इसम प्रत्येकी भरलेल्या गॅस सिलेंडरमधून एक ते दीड किलो गॅस काढून दुस-या सिलेंडरमध्ये भरताना आढळून आले असताना त्यांना पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व त्यांचे पथकाने शिताफीने ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे सुनिल जगाराम बिष्णोई वय २२ वर्षे, राजेश सैराम बिष्णोई वय वर्षे, कैलास बाबूराम बिष्णोई वय २४ वर्षे, गोपाल बाबूराम बिष्णोई वय २३ वर्षे, श्रावण खमूराम बिष्णोई वय २९ वर्षे, कैलास बिरबलराम बिष्णोई वय २० वर्षे अशी सांगितली. वरील सर्व सुमित शिंदे यांच्या प्रियांकानगरी वाघोली येथील भाडयाच्या खोलीत रहात असल्याचे सांगून सदर सिलेंडर हे सुमित शिंदे यांच्या भारत गॅस कंपनी एजन्सी प्रियांकानगरी वाघोली येथील एजन्सी गोडाऊमधून त्यांचेकडील टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो नं. एम एच १२ जिटी ९४५६, अॅप्पे पॅगो व एम एच १२ के पी ८२४६, अॅप्पे व एम एच १२ एल टी ००४९, अॅप्पे व एम एच १२ एल टी २५३२ व एम एच १२ के पी ७६९० यांमध्ये भरलेले सिलेंडर घेवून आलेबाबत सांगितले.
त्यांच्या ताब्यात १९४ गॅसने भरलेले सिलेंडर व २७ रिकामे सिलेंडर त्यात ०८ कमर्शिअल सिलेंडर ०३ डिजीटल गॅस वजनकाटा गॅस भरण्यासाठी लागणारे ०४ लोखंडी पाईप व ०४ अॅप्पे पॅगो व एक टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो असा एकूण १३,५८,०७६ रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर घटनेबाबत पुरवठा निरीक्षक हवेली यांचे फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. ९३०/२०२० भादंविक २८६ सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे वर नमूद सहा इसम एजन्सी चालक, जागा मालक यांचेविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ. अभिनव देशमुख सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रमीण मा. विवेक पाटील, सो. अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग डॉ. सई भोरे पाटील, सो. उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग सुनील कोळी, तहसिलदार हवेली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप मानकर पोलीस निरीक्षक, संजय भोसले महसूल नायब तहसिलदार हवेली, चनबस गवंडी पुरवठा निरीक्षक हवेली किशोर शिंगोटे, मंडल अधिकारी वाघोली गणेश सासणे, तलाठी लोणीकंद सहा पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, गुन्हे शोध पथकाचे हवालदार बाळासाहेब सकाटे, पोना श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, चापोना राजीव शिंदे, पोकॉ संतोष मारकड, समीर पिलाने, ऋषीकेश व्यवहारे, सूरज वळेकर, दत्ता काळे, होम गुंडकर यांनी कारवाई केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे