डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूझाचा पासपोर्ट जप्त

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूझावर झालेल्या फसवणूकीच्या आरोपात त्याच्या समोरील अडचणीत वाढ झाल्याचे समजते आहे. हायकोर्टानं दिलेल्या आदेशानुसार आता गाझियाबाद पोलिसांनी रेमो डिसूझाचा पासपोर्ट जप्त केला आहे.अशी माहिती समोर येत आहे.

रेमो डिसूझाच्या विरोधात सिहानी गेट पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सूत्रांच्या माहितीनुसार, सत्येंद्र त्यागी नावाच्या एका व्यक्तीनं रेमो डिसूझाच्या विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. त्यागी यांचा आरोप आहे की, २०१३ मध्ये त्याची रेमो डिसूझाशी ओळख झाली होती.
काही दिवसांनी रेमोनं त्याचा सिनेमा ‘अमर मस्ट डाय’मध्ये ५ कोटी रुपये गुंतवण्यास सांगितलं होतं. त्यागी यांचं म्हणणं आहे की, रेमोनं त्यावेळी ही रक्कम दुपटीनं परत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्यानं मूळ रक्कमही परत केली नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा