भारताचे विख्यात वास्तुविशारद डॉ. बालकृष्ण विठ्ठलदास दोशी यांचे निधन

अहमदाबाद, २५ जानेवारी २०२३ : भारताचे विख्यात वास्तुविशारद डॉ. बालकृष्ण विठ्ठलदास दोशी (वय ९५) यांचे मंगळवारी (ता.२४) अहमदाबाद येथील राहत्या घरी निधन झाले. डॉ. बी.व्ही. दोशी हे विख्यात वास्तुविशारद आणि शहर नियोजनकार होते. त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

डॉ. दोशी यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे वास्तुविशारद क्षेत्रातील नोबेल समजल्या जाणाऱ्या प्रित्झकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्काराने सन्मानित होणारे डॉ. दोशी हे पहिले भारतीय होते.

डॉ. बालकृष्ण दोशी यांनी ली कार्बुजिअर आणि लुई कान यांसारख्या दिग्गज वास्तुविशारदांसोबत काम केले होते. वास्तुविशारद डॉ. बालकृष्ण दोशी यांचा जन्म १९२७ मध्ये पुण्यात झाला. त्यांनी इंडोलॉजी संस्थान, सीईपीटी विद्यापीठ, अहमदाबादमधील कनोरिया कला केंद्र, आयआयएम बंगळुरू, इंदूरमधील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठीच्या अरन्या लो कॉस्ट हाऊसिंग आदी प्रकल्पांची वास्तुरचना त्यांनी केली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा