दानात आलेल्या ५० कोटी जुन्या नोटा बदलून द्या ; तिरूपती देवस्थान

आंध्रप्रदेश, दि. १५ जुलै २०२०: “आज मध्यरात्री,यानी ८ नवंबर २०१६ के रात्री १२ बजे से वर्तमान में जारी ५०० रुपये ओर १००० रुपये के करन्सी नोट लिगल टेंडर नहीं रेहगें”

८ नोव्हेंबरची ती रात्र भारताच्या इतिहासात नोंद केलेली रात्र आहे. ज्या मध्ये भारतात भाजपची सत्ता येताच पंतप्रधान मोदी यांनी हि नोटबंदी जाहीर करण्याची मोठी घोषणा केली होती. भारतातील काळा पैसा बाहेर आणण्यासाठी केलेली हि नोटबंदीने २०१६ ला अनेकांचे बळी देखील घेतले. पण किती पैसे सरकारच्या खजिन्यात आले त्याचा आज पर्यंत खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला नाही. तर ते या निर्णयाला यशस्वी झाल्याचे जनतेला सांगतात तर विरोधक आजही नोटबंदीच्या विषयावर ताशेरे ओढताना दिसतातं.

अशातच आता आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात मागील काही महिन्यात तब्बल ५० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा दान करण्यात आल्या आहेत आणि तिरुपती ट्रस्टचे अध्यक्ष वाईवी सुब्बारेड्डी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेऊन या जुन्या नोटा बदलून देण्याची मागणी केली. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर तिरुपती बालाजी मंदिरातील दान कमी झाले असून मंदिर उघडल्यानंतर फक्त एका महिन्यात मंदिरात १७ कोटी रुपयांचे दान आले. हे कोरोनापूर्वी येणाऱ्या दानाच्या १० टक्केही नाही. असे सांगण्यात आले.

मंदिराशी जुडलेल्या सूत्रांने सांगितले की या नोटा अनेक दिवसांपासून दानमध्ये येत आहेत. लॉकडाऊनमुळे याबाबत कोणताच निर्णय झाला नव्हता. अशा विशेष परिस्थितीत नोटा बदलून दिल्यास मंदिराला मोठी आर्थिक सहाय्यता होईल, मंदिर प्रशासनाकडून अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीबाबत कोणताच तपशील जाहीर झाला नाही. असे मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे. तसेच पुढे पीआरओटी रवीने सांगितले की अद्याप याबाबत माहिती देण्यास मंदिराकडून नकार देण्यात आला आहे.

या सर्व परिस्थिती मध्ये आज साडेतीन वर्षानंतर ही एव्हढ्या मोठ्या प्रमाणात मंदिरात जुन्या नोटांचे दान येत असल्याने केंद्राने केलेली नोटबंदी खरंच यशस्वी रित्या पार पडली का? असा प्रश्न आता उद्भवताना दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा