काळतोंड्या हा बिनविषारी साप भारतात दुर्मिळ असल्याने, हा क्वचितच आढळतो. डोक्याचा भाग काळा असल्याने या सापाला ‘ब्लॅक हेडेड स्नेक’ किंवा काळतोंड्या साप असे नाव पडले. या सापाला ‘डय़ुमेरिल्स ब्लॅक हेडेड स्नेक’ या नावानेसुद्धा ओळखले जाते. याचे शास्त्रीय नाव ‘सितिनोफिस सबपंक्टॅटस’ आहे. ही सर्वात लहान कोल्युब्रीड प्रजातींपैतीं पैकी एक प्रजातीं आहे जी नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश सह संपूर्ण भारत आणि उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आढळते.
मुख्यतः हा काळतोंड्या साप संध्याकाळपासून पहाटेपर्यन्त ऍक्टिव्ह असतो. तपकिरी मातकट शरीर, काळ्या रंगाचे डोके आणि टोकदार शेपटी यावरुन या सापाला सहज ओळखता येते. काळतोंड्या या सापाची सरासरी लांबी २५ सें.मी. ते जास्तीत जास्त ४६ से.मी.असते. हा वाळा सापा पेक्षा थोडा मोठा असतो. याचा रंग लालसर तपकिरी असून शरीरावर अगदी बारिक काळे ठिपके असतात. या सापाची विशेष खूण म्हणजे डोके काळे व लांब गोलाकार शरीर आहे.
हा बिनविषारी जातीचा साप आहे. हुबेहूब असाच दिसणारा ‘पोवळा’ नावाचा साप आहे. त्याचेही काळे डोके असते मात्र त्याच्या शेपटीवरही काळा पट्टा असतो. हा पोवळा साप मात्र विषारी असतो. पोवळा आणि ब्लॅक हेडेड स्नेक या दोन सापांच्या रंग व आकारातील साम्यामुळे बिनविषारी काळतोंड्या सापाला विषारी ‘पोवळा’ साप समजून मारले जाते. काळतोंड्या सापाचे खाद्य लहान पाली, किडे किंवा इतर छोटे साप हे आहे. हा साप पालापाचोळ्यात राहणे पसंत करतो.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.