नवी दिल्ली, २७ जानेवारी २०२१: आज आपण ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. तर आधीच संपूर्ण जग या कोरोना महामारीशी लढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर भारत आज साजरा करत आसलेल्या गणतंत्र दिवसाबद्दल आपण काही रंजक गोष्टी पाहणार आहोत.
२६ जानेवारी १९३० हा दिवस आधी स्वातंत्र्य दिन किंवा पुर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा झाला होता.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या तीन वर्षानंतर २६ जानेवारी १९५० ला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता.
राजपथ येथे १९५५ मध्ये पहिली प्रजासत्ताक दिनची परेड आयोजित करण्यात आली होती.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. यामधे ४४८ आर्टीकल्स आहेत आणि हे इंग्रजी व हिंदी भाषेत लिहिण्यात आले आहे.
डाॅ.बी.आर. आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिन्यात भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला.
नवीन काय?
राफेल फाइटर जेट आणि पहिली महिला फाइटर पायलट….
पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधे राफेल या लढाऊ विमानाने भाग घेतला.हे विमान भारताने फ्रान्सकडून विकत घेतले आहे. तर सप्टेंबर २०२० मध्ये त्याचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला आहे.
२० वर्षीय फ्लाईट लेफ्टनंट भावना कांत या पहिल्या महिला फाइटर पायलट आहेत. ज्यांनी यंदाच्या या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधे भाग घेतला. भावना या बिहारच्या दरभंगा येथील असून भारतीय हवाई दलातील महिला पायलट पैकी एक आहेत.
प्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच परेडमधे यंदा लद्दाखचा चित्ररथ सामील झाला. यामधे लेह जिल्ह्यातील थिकसे येथील शिखरावरील थिकसे मठाची माहिती देण्यात आली. लद्दाखमधील सर्वाधिक पर्यटकाडून भेट देणारे हे ठिकाण आहे.
प्रमुख पाहुण्यांशिवाय प्रजासत्ताक दिन साजरा…..
दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या देशात परदेशी पाहुण्यांना निमंत्रित केले जाते. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जाॅन्सन यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे भारत भेट रद्द केली. हे ५ दशकात पहिल्यांदाच घडले असून या आधी १९५२, १९५३ आणि १९६६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात परदेशी पाहुणे नव्हते.
तसेच दरवर्षी लष्कर व निमलष्करी दलाकडून मोटार सायकलवरून साजरी करणारी प्रात्यक्षिके यंदा नव्हती.
बांगलादेशी सैनिकांची हजेरी….
बांगलादेशची १२२ सैनिकांची तुकडी यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधे सामील झाली. पाकिस्तान पासून वेगळे होऊन स्वतंत्र बांगलादेश झाल्याचा ५० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने हि तुकडी दिल्लीत आली. याआधी फ्रान्स(२०१६) आणि संयुक्त अरब अमिरात(२०१७) या सैनिकांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधे हजेरी लावली होती.
काहीतरी मिसिंग ही होतं…
पहिल्यांदाच परेड हि छोटी झाली.परेड विजय चौकातून सुरू होऊन नॅशनल स्टेडियम जवळ संपली. तर दरवर्षी ८.२ किलोमीटर अर्थात लाल किल्ल्यापर्यंत हि परेड आसायची आणि यंदा ती फक्त ३.३ किलोमीटर झाली. तसेच या कार्यक्रमात १५ वर्षाखालील मुलांना परवानगी नव्हती. यंदा २५ हजार नागरिकाच कार्यक्रमात सहभागी होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हि खबरदारी घेण्यात आली होती. तर दरवर्षी नागरिकांची संख्या १ लाख ३० हजाराच्या आसपास असते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखील जाधव