भारताच्या सर्वात शक्तिशाली संरक्षण उपग्रह रीसॅट-२ बीआर १ चे यशस्वी प्रक्षेपण

आज मंगळवारी ११ डिसेंबर रोजी संध्याकाळी ३.४० वाजता हा शक्तिशाली इमेजिंग उपग्रह प्रक्षेपित झाला. त्याचे नाव रीसॅट-२ बीआर १ आहे. हे अवकाशात तैनात झाल्यानंतर भारताच्या रडार इमेजिंगची शक्ती अनेक पटींनी वाढेल. तसेच, शत्रूंवर लक्ष ठेवणे अधिक सोपे होईल. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा बेटावर असलेल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून हा उपग्रह प्रक्षेपित केला गेला.
भारताचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही) रॉकेट याच्या सहायाने आज देशातील अत्याधुनिक गुप्तचर उपग्रह ‘रीसॅट-२ बीआर १’ आणि नऊ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले. रीसॅट-२ बीआर १ हा ६२८ किलो वजनाचा रडार इमेजिंग अर्थ कन्सर्वेशन उपग्रह आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा