पिंपरी-चिंचवड, १ डिसेंबर २०२२ : संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समिती व कॅम्लिन आयोजित बालदिन विशेष चित्रकला स्पर्धा रविवारी (ता. २७ नोव्हेंबर) चिंचवडच्या जिजाऊ पर्यटन केंद्र उद्यानामध्ये उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. ७ ते ११ वर्ष व १२ ते १६ वर्ष व दिव्यांग गट अशा तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.
संस्कार भारतीच्या ध्येयगीताने कार्यक्रमाची सुरवात
संस्थेच्या सचिव सौ. लीना आढाव यांनी स्पर्धेचे नियम व विषय स्पर्धकांना सांगितले. संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन काळभोर यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष श्री. हर्षद कुलकर्णी यांनी संस्कार भारतीच्या विविध कार्यरत असलेल्या विधा व सदस्य नोंदणीबद्दल माहिती उपस्थित पालक आणि मान्यवरांना दिली.
पर्यावरण संरक्षण, निसर्गचित्र आणि भविष्यातील भारत अशा दिलेल्या विषयांवर स्पर्धकांनी अतिशय सुरेख आणि प्रबोधन करणारी चित्र रेखाटली. चित्र काढण्यासाठी समितीकडून कागद देण्यात आला.
स्पर्धेच्या निकालाच्या प्रतीक्षा कालावधीत संस्थेच्या मासिक संगीत सभा सहप्रमुख श्री. सारंग चिंचणीकर आणि सहप्रमुख शर्मिला शिंदे व सहकारी यांच्यातर्फे बडबडगीतांचा कार्यक्रम झाला. यामध्ये बासरीवादक अनिरुद्ध सराफ, सौ. मुग्धा बारहाते, ड्रमर श्री. स्वोजस बिलूरकर, श्री. नीलेश शिंदे, कु. स्वरा शिंदे यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
संस्थेचे चित्रकला विधाप्रमुख श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
लहान गट (७ ते ११) : मृदुल झामरे (प्रथम), त्रिशन थंडेर (द्वितीय) समृद्धी चव्हाण (तृतीय), सोहम आनंद सातपुते (उत्तेजनार्थ).
मोठा गट (१२ ते १६) : श्रृणल पाटील (प्रथम), धैर्य सावंत (द्वितीय), कृत्तिका विघे ( तृतीय), स्नेहा शेंडगे (उत्तेजनार्थ).
दिव्यांग गट : महेक विनोद गोयर.
स्पर्धेसाठी स्व. गजानन पोपटराव चिंचवडे, स्व. प्रसन्न शेखर चिंचवडे व स्व. हेरंब चिंचणीकर यांच्या स्मरणार्थ स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देण्यात आली.
बक्षीस वितरण समारंभ माननीय श्रीमती अश्विनीताई चिंचवडे नगरसेविका पिंपरी-चिंचवड मनपा, पुणे जिल्हा सर्व शिक्षा अभियानाच्या अधिकारी व शिक्षणाधिकारी शिल्पा रंधवे , सुधीर बबनराव चिंचवडे, श्री. रामचंद्र जमखंडी, श्री. दुर्गेश देशमुख, कोशप्रमुख ठाणे जनता बँक, श्री. कमलाकर गोसावी, श्री. राजेंद्र हरिभाऊ चिंचवडे, शहर अध्यक्ष भाजप व्यापारी आघाडी, श्री. राजेंद्र दिवाणे यांच्या हस्ते पार पडला.
संस्कार भारतीचे सहसचिव श्री. सतीश वर्तक, प्रांजल पाडेकर, शोभाताई पवार, श्री. सुमेश सावंत, अंजली, विनोद गोयर, उमाकांत कुंभार, सौ. प्राजक्ता काळभोर, सेजल जोशी, सौ. संचिता सागवेकर, छाया आढाव, तन्मय आढाव, अनुराग चिंचणीकर यांनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य केले. अध्यक्ष श्री. सचिन काळभोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील