पुरस्कार मिळतो तेव्हा जबाबादारी देखील वाढते, हा पुरस्कार १४० कोटी देशवासीयांना समर्पीत, पंतप्रधानांचे उदगार

पुणे, १ऑगस्ट २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करून उपस्थित जनमाणसांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुकाचा वर्षाव केला. लोकमान्य टिळक पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पुणे ही टिळक, फुले, चाफेकर या वीरांची भूमी आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार स्विकारताना मला आनंद होत असल्याची भावना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांचे स्वागत पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि भेट देऊन करण्यात आले. मोदींनी यावेळी उपस्थितांशी मराठीतून संवाद साधत कार्यक्रमात हर्षउत्साह तयार केला.तर अनेकांना यामुळे आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे. एखादा पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा जबाबादारी देखील वाढते. हा पुरस्कार मी १४० कोटी देशवासीयांना समर्पीत करतो.

ज्यांच्या नावात साक्षात गंगा नदीचे नाव आहे. अशा पुरस्काराची रक्कम मी नमामि गंगा या प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात पुणे आणि काशीला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला वेगळे वळण दिले आहे. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा