मुंबई, १६ डिसेंबर २०२०: देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात वाढत असले तरी संकट कायम आहे. त्यामुळं सरकारकडून काळजी म्हणून ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर साठी हा निर्णय घेतला जावू शकतो. मुंबईकराबरोबर राज्यातील इतर शहरांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
लाॅकडाऊन चे निर्बंध कमी केल्या नंतर क्लब आणि हॉटेल्समध्ये नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं महापालिकेच्या कारवाईत समोर आलं आहे. त्यामुळं खबरदारी चा उपाय म्हणून सरकार पुन्हा एकदा कोरोना विरोधात कंबर कसणार असून २० डिसेंबर रोजी ख्रिसमस आणि नववर्षाची नियमावली जाहीर केली जाऊ शकते.
काही दिवसांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत टप्प्याटप्प्यानं राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, असं असताना वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्यात आणण्याचं आवाहनही राज्य शासनापुढं आहेच. एकीकडे हे सण असले तरी नागरिक कश्या पद्धतीनं सरकारला सहकार्य करतील त्यावर हे अवलंबून आहे.
दिवाळी मधे ही लाॅकडाऊन थोडं शिथिल होतं पण, त्याचा परिणाम हा संपूर्ण देशभरात पाहयला मिळाला. नागरिकांनी प्रशासनाचे नियम पायदळी तुडवत दिवाळी साजरी केली अणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. आता येणाऱ्या या दिवसात ही तशी काही परिस्थिती उद्भवू नये म्हणूनराज्य सरकार ठोस पाऊलं उचलणार असल्याचं समोर येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव