निवृत्त अप्पर पोलीस उपायुक्त अरविंद माने यांची आत्महत्या

30

फलटण, दि.१० मे २०२०: फलटण येथील रहिवासी राज्य गुप्त वार्ता विभागाचे निवृत्त अप्पर उपायुक्त अरविंद गुलाबराव माने (वय, ६५ रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांनी शनिवारी (दि.९) पहाटे तीन वाजता घराच्या गच्ची वजा छज्जावर छताला दोरीच्या साह्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन व चौकशीवरुन दिसून येत आहे. त्यांनी कुंडल, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर येथे पोलीस दलात काम केले होते . सातारा येथे ते राज्य गुप्त वार्ता विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. पुणे येथील ट्रेनिंग सेंटरचे इनचार्ज म्हणून अप्पर उपायुक्त म्हणून त्यांना बढती मिळाली होती. मात्र काही वर्षांपासून ते पोटाच्या आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा