चोरीस गेलेले ४२ मोबाईल फिर्यादींना परत

बारामती, ५ जानेवारी २०२१: बारामती शहरातील वर्दळ असणाऱ्या मारवाड पेठेतील निरंजन दिलीप पारख यांच्या मोबाईल दुरूस्तीच्या दुकानाचा दरवाजा उचकटुन एकुण ४२ वेगवेगळ्या कंपनीचे ३,४४,३३३ रूपये किंमतीचे मोबाईल चोरी झाल्याची तक्रार पारख यांनी दि. ११ नोव्हेंबर २०२० रोजी बारामती शहर पोलीस स्टेशनला दिली होती.

या चोरी प्रकरणी भा.द.वि.कलम ४५७, ३८०, ३४, प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी कसून तपास केल्यावर गुन्हयातील आरोपींना बालाजी उर्फ बाल्या अनिल माने,आतिफ नजामुददीन तांबोळी, साहिल अय्याज शकीलकर, प्रतिक दिलीप रेडे, प्रतिक शशीकांत सावंत, एक अल्पवयीन आरोपी, विश्वजीत बारीकराव यमगेर, अनिकेत गायकवाड, सलमान बागवाण या मोबाइल संच हस्तगत करून तक्रारदार निरंजन पारख यांना चोरीस गेलेले मोबाईल आज परत देण्यात आले.

कारवाई मध्ये पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे,पोलीस नाईक रूपेश साळुखे, पो.का. सुहास लाटणे, दशरथ इंगवले, बंडू कोठे, योगेश कुलकर्णी, अजित राऊत, तुषार चव्हाण, अकबर शेख अशोक शिंदे कारवाई मध्ये सहभागी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा