पुणे सोलापूर महामार्गावर महसूल विभागाची वाळू माफियांविरोधात कारवाई..!

लोणी काळभोर दि. १० सप्टेंबर २०२०:हवेली मध्ये वाळूमाफिया यांच्या विरोधात महसूल विभागाने मोहीम उघडली असून ४ ट्रक पोलिस स्टेशन हाडपसरच्या ताब्यात देण्यात आले आहेत व ७ ट्रक तहसीलदार हावेली यांच्या ताब्यात पुढील कार्यवाही साठी देण्यात आलेले आहेत. ही कारवाई मा. जिल्हा अधिकारी व मा. अप्पर जिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पथक प्रमुख तहसीलदार बालाजी सोमवंशी, नायब तहसीलदार संजय भोसले, बालाजी चितरवार, अकुश आटोळ, महसूल सहाय्यक योगेश बंगले, खनिकरम अधिकारी बामणे, व उरुळी कांचन सर्कल, थेऊर सर्कल, हडपसर सर्कल, यांनी सापळा रचून कारवाई केली आहे.

पथकाने आज एका दिवसांत ११ वाहने ताब्यात घेऊन हवेली तालुक्यातील अवैधरीत्या वाळूउपसा व वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार यांना प्राप्त होताच त्यांनी तालुक्यातील पुणे – सोलापूर रोडवर सकाळी नऊ वाजता या वाहनांवर कारवाई केली.

या कारवाईत पुणे सोलापूर रोडवर उरुळी कांचन, शेवाळवाडी, येथे ट्रॅक पकडण्यात
तहसीलदार बालाजी सोमवंशी, संजय भोसले, यांच्या पथकाला यश आले. ही कारवाई यापुढे सुद्धा अशीच सुरू राहील व दोन ते तीन ट्रक अंगावर घालण्याचाही प्रयत्न वाळू ट्रक ड्रायव्हरने केला आहे. व तहसीलदारांना गुंगारा देऊन मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियावर कडक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार सोमवंशी यांनी सांगितले आहे.

तहसीलदारांनी वाळू तस्करांना विचारणा केली असता ट्रक ड्रायव्हरने तहसीलदारांना असे सांगितले आहे. की आमच्या गाड्यांचे कार्ड आहेत. व आमचे हप्ते पोलीस स्टेशनला चालू आहेत. असे ट्रक ड्रायव्हरने बोलताना तहसीलदार सोमवंशी यांना सांगितले आहे. हप्ते घेणाऱ्या पोलीस प्रशासनावर कारवाई होणार का असेही ट्रक ड्रायव्हरने बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा