महसूल गुप्तचर विभागाने ३० कोटी रुपयांची ३४ विदेशी घड्याळे केली जप्त, एकाला अटक

मुंबई, २३ जुलै २०२३ : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई प्रादेशिक युनिटने कोलकाता येथील एका व्यक्तीच्या घरातून ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची उच्च श्रेणीची घड्याळे जप्त केली आहेत. डीआरआयच्या माहितीनुसार, एका टीप च्या आधारे गेल्या आठवड्यात सिंगापूरहून आलेल्या व्यक्तीला कोलकाता विमानतळावर अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून ग्रुबेल फोर्से कंपनीचे एक अतिशय महागडे घड्याळ जप्त करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने या घड्याळाबद्दल सीमाशुल्क अधिकाऱ्यांना यापूर्वी माहिती दिली नव्हती, त्यामुळे त्याला सीमा शुल्क कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यानुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी कोलकाता येथील एका निवासी संकुलात त्याच्या घराची झडती घेतली.

या झडतीमध्ये ग्रीबेल फोर्सी, परनेल, लुई व्हिटॉन, एमबी अँड एफ, मॅड, रोलेक्स, ऑडेमार्स पिगेट आणि रिचर्ड मिलसह विदेशी कंपन्यांची ३४ महागडी घड्याळे जप्त करण्यात आली. बहुतेक घड्याळे अत्यंत महागडी असून, त्यांची किंमत ३० कोटींहून अधिक असल्याचे कळत आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा