महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली जेजुरीच्या पालखी मैदानाची पाहणी

36

जेजुरी, ८ जून २०२३: संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत १६ जून रोजी मुक्कामी विसावत आहे. त्या अनुषंगाने राज्यांचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जेजुरीच्या पालखी तळाची पाहणी करून अधिकारी वर्गाशी चर्चा केली. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडाच्या पायथ्याशी व ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठावर नऊ एकर जागेत गेल्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी नव्याने पाळखी तळ विकसित करण्यात आला आहे.

आज सकाळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जेजुरीच्या पाळखी तळाला भेट दिली. यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, आळंदी देवसंस्थानचे विकास ढगे, तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नगरपालिकेच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी नऊ एकर जागेत नव्याने पाळखी तळ विकसित केला जात आहे. त्या अनुषंगाने पालिकेच्या वतीने पालखी मैदान परिसरात वृक्ष लागवड मोहिम हाती घेण्यात आली आहे. राज्यांचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संजय जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा