केंद्रशासनाचे इथेनॉल धोरणामुळे साखर कारखानदारीस नवसंजीवनी

इंदापूर, २४ डिसेंबर २०२०: केंद्रशासनाच्या इथेनॉल उत्पादनाच्या धोरणामुळे साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळून उभारी घेणेस मदत होईल. तसेच अतिरिक्त साखर साठयाच्या प्रश्नावर पर्याय निघून कारखान्यांवरील कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन महाराष्ट राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी, तथा कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील, यांनी कर्मयोगी कारखान्याच्या बी हेवी मोलॅसिस उत्पादन शुभारंभावेळी व्यक्त केले.

सदर बी हेवी मोलॅसिस उत्पादन शुभारंभ हर्षवर्धनजी पाटील व पद्मा भोसले व्हाईस चेअरमन यांच्या शुभहस्ते आज करण्यात आला. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असून केंद्रशासन व महाराष्ट शासन निर्णयानुसार कारखान्याने बी हेवी मोलॅसिसचे उत्पादन सुरू केलेले आहे. सदर बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल उत्पादन करुन ऑईल कंपनीला पुरवठा करण्यात येणार आहे.

बी हेवी मोलॅसिस मुळे कारखान्याच्या उत्पादन खर्चात बचत होवून उत्पादित इथेनॉल ऑईल कंपन्यांना पुरवठा केलेने सभासदांना चांगला ऊसाचा दर मिळू शकणार आहे. सध्या देशामध्ये जवळपास ६०० कोटी लिटर्स इथेनॉलची मागणी आहे. त्यापैकी महाराष्ट राज्याचे १०८ कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेण्याचे उदिदष्ठ आहे.

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने या हंगामात ८० लाख ते १ कोटी लिटर्स इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यास प्रतिलिटर ५७ रूपयेप्रमाणे दर मिळणार आहे. महाराष्ट राज्यामध्ये बी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करणारे ४८ कारखाने आहेत, यामध्ये नव्याने उतरलेले २३ कारखाने आहेत. महाराष्ट शासनाने सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करणेसाठी भांडवलाकरिता व्याज अनुदान द्यावे असेही ते म्हणाले.

इथेनॉल प्रकल्पाकरिता केंद्रसरकार 6 टक्के अनुदान देत असून महाराष्ट शासनाने देखील ६ टक्के अनुदान देवून इथेनॉल निर्मितीस सहकारी साखर कारखान्यांना हातभार लावावा. याबाबत साखर संघ, नॅशनल फेडरेशन व संबंधित पेटोलियम कंपन्यांशी पाठपुरावा करीत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या हंगामामध्ये ३० टक्के साखर उत्पादन कमी करून त्याऐवजी इथेनॉल निर्मिती वाढविणे हा एकमेव पर्याय साखर कारखानदारीपुढे राहिलेला आहे. भविष्यामध्ये इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरण करणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास दुधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, निरा-भिमा कारखान्याचे संचालक शिर्के दादा, मेघ:शाम पाटील, इंदापूर नगरपालिका उपाध्यक्ष धनंजय पाटील, शेटे सर तसेच कारखान्याचे संचालक श्री. भरत शहा, श्री. भास्कर गुरगुडे, श्री. विष्णू मोरे, श्री. हनुमंत जाधव, श्री. मच्छिंद्र अभंग, श्री. अंकुश काळे, श्री. सुभाष काळे, श्री. प्रशांत सुर्यवंशी, श्री. यशवंत वाघ, श्री. मानसिंग जगताप, श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. राहूल जाधव, श्री. अंबादास शिंगाडे, श्री. वसंत मोहोळकर, श्री. केशव दुर्गे, श्री. अतुल व्यवहारे, श्री. राजेंद्र चोरमले, श्री. पांडुरंग गलांडे, श्री. सुभाष भोसले, सौ. जयश्री नलवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.बाजीराव जी. सुतार, व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा