गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा श्रीमंत छत्रपती सौ. चंद्रलेखाराजे यांचं निधन

श्रीमंत छत्रपती सौ. चंद्रलेखाराजे यांचं निधन

सातारा, दि. १३ सप्टेंबर २०२०:राजघराण्यातील स्नुषा चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे आज (रविवार) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांच्या त्या पत्नी आहेत.

महिला मंडळाची शाळा, विविध सामाजिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. सातारा शहरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर सातारा व पुणे येथील रुग्णांलयामध्ये उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्यांच्यावर अदालत राजवाडा येथेच उपचार सुरु होते.
दरम्यान, आज (रविवार) दुपारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. चंद्रलेखाराजे भोसले या खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या चुलती होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सामाजिक संस्था व नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी केव्हा केला जाणार याची माहिती कुटुंबियांकडून अद्याप सांगण्यात आलेली नाही.

खासदार संभाजीराजे भोसले आणि आमदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुकवर त्यांच्या निधनाची माहिती देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version