ब्रिटन, २७ ऑक्टोबर २०२२: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मैत्रीचे नाते आहे, हे सर्व जण जाणतोच. या नात्यामुळे आता ब्रिटन आणि भारतात राहिलेला अपूर्ण करार लवकरच पूर्ण होणार आहे. ब्रिटनची राजकारणाची स्थिती अतिशय बिकट होती. त्यामुळे हा करार अर्धवट राहिला होता. आता तो करार पूर्ण होण्याच्या मार्गावर असून लवकरच या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील असे, आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव ग्रेग हॅंण्डस यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी असंही सांगितलं की, भारत हा एक शक्तिशाली देश आहे. ब्रिटन आणि भारत यांच्यातला करारची सर्व बोलणी झाली असून हा करार झाल्यानंतर २०५० पर्यंत भारत जगातली तिसरी आर्थिक शक्ती होऊ शकते.
एफटीएचे दोन्ही देशांना खास फायदे होऊ शकतात. प्रामुख्याने दोन्ही देशातील आर्थिक करार वाढेल. दोन्ही देशातल्या बाजारपेठेत दोन्ही देशांना वाव मिळेल. तसेच दोन्ही देशातील आर्थिक संबंध मजबूत होऊन त्याचा दोन्ही देशांना आर्थिकदृष्ट्या फायदा होईल.
त्याचबरोबर दोन्ही देशातील आर्थिक करारामुळे आयात निर्यात वाढेल. तसेच एफटीए करारानुसार आयात-निर्यातीवर कर लागणार नाही. त्यामुळे दोन्ही देश सक्षम होतील, असेही या करारानुसार सांगण्यात आले आहे.
त्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातला दुवा आता बळकट होऊन आता भारत पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्यास सुरुवात झाली आहे, असंच आता म्हणावं लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस