गोल पोस्ट महाराष्ट्र ऋषीकेश अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

ऋषीकेश अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२२ : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेशला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पीएमएलए न्यायालयाकडून १०० कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ३ लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जामीनावर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आणि त्यानंतर आज दुपारी निर्णय अपेक्षित होता. मागील सुनावणीच्या वेळी ऋषिकेश देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात पूर्वी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला होता. मात्र सीआरपीसी कलम ८८ अंतर्गत जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. त्याअंतर्गत कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version