गोल पोस्ट राष्ट्रीय दिल्लीत फुटवेअर फॅक्टरीला भीषण आग, बचावकार्य सुरू

दिल्लीत फुटवेअर फॅक्टरीला भीषण आग, बचावकार्य सुरू

नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर २०२२ : राजधानी दिल्लीतील लॉरेन्स रोड औद्योगिक परिसरात फुटवेअर कारखान्यात भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

ही आग एवढी भयानक आहे की, कारखान्यातून मोठ मोठे धुराचे लोट निघत आहेत, ते पाहून तेथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नेमकी का लागली ते सध्या तरी समजू शकलेले नाही.

यापूर्वी दिल्लीतील चांदनी चौकातील भागीरथी पॅलेस इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये भीषण आग लागली होती. त्यामध्ये जवळपास दोनशे दुकाने जळून खाक झाली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version